यवतमाळ,
Yavatmal News : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या हरकती व सूचनाकरीता 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. संबंधित याद्यांवर प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांचा विचार करून आता अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती उपनिवडणूक अधिकारी (ग्रा.पं.नि.) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी दिली.
महाराष्ट्र जिप व पंस अधिनियम 1961 च्या कलम 13 च्या उपकलम (1) व कलम 58 च्या उपकलम (1)(ब) अन्वये, यवतमाळ जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग क्रमांक 1 ते 62 व पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक गण क्रमांक 1 ते 124 या साठीच्या अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध झाल्या. या अंतिम मतदारयाद्या सर्वसामान्यांच्या पाहणीसाठी या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालये, मतदार याद्यांची इलेक्ट्रॉनिक प्रत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.