तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Mandal Executive Committee Meeting : राळेगाव येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांच्या जिल्हा दौèयाच्या अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी भाजपा कार्यालयात युवा संवाद मेळावा तथा मंडळ कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियोजनाकरिता युवा मोर्चा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सूरज गुप्ता यांनी संबोधित केले. व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तसेच राळेगाव शहर अध्यक्ष अभिजित काळे यांच्या नेतृत्वात राळेगाव शहर कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सूरज गुप्ता, रुपेश राऊत, सौरभ पवार, सुदर्शन शेंद्रे, चारुदत्त पाटील, शहर अध्यक्ष अभिजित काळे, किरण गाडगे, तालुका उपाध्यक्ष सारंग मानकर, निलय घीणमिने, पीयूष महाजन, प्रफुल्ल येंगडे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.