डॉ. देवयांश ललित निमोदिया यांना सुवर्णपदक

05 Nov 2025 22:19:10
यवतमाळ, 
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रेडिओडायग्नोसिस विभागातील पदव्युत्तर निवासी Dr. Devyansh Lalit Nimodia डॉ. देवयांश ललित निमोदिया यांना शैक्षणिक सत्र २०२५ साठी एमडी रेडिओडायग्नोसिसमध्ये सर्वोच्च गुण मिळविल्याबद्दल विद्यापीठ सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
 

devansha 
 
Dr. Devyansh Lalit Nimodia डॉ. देवयांश हे ललित निमोदिया यांचे सुपुत्र असून ते यवतमाळ येथील संजीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोमोटर-डायरेक्टर आहेत. आपल्या विलक्षण शैक्षणिक कामगिरीमुळे आणि वैद्यकीय संशोधनातील निष्ठेमुळे डॉ. देवयांश निमोदिया यांनी आपल्या गावाचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी आतापर्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३० हून अधिक वैज्ञानिक संशोधन लेख प्रकाशित केले वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानवृद्धी आणि संशोधनाच्या गुणवत्तेत मोलाचे योगदान दिले आहे.
डॉ. देवयांश निमोदिया यांनी एशियन-ओशिनियन काँग्रेस ऑफ रेडिओलॉजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानावरील आपले संशोधन सादर केले आहे. त्यांचे प्रमुख आवडीचे क्षेत्र म्हणजे ‘इंटरव्हेन्शनल आणि व्हॅस्क्युलर रेडिओलॉजी, हेपॅटोबिलिअरी इमेजिंग आणि नवोन्मेषी एमआरआय’ तंत्रज्ञान हे आहे.
 
 
सुवर्णपदक मिळाल्याबद्दल डॉ. निमोदिया यांनी ही सन्मानाची गोष्ट असल्याचे सांगत मार्गदर्शक, कुटुंबीय आणि शिक्षकवर्गाचे आभार मानले. विद्यापीठ प्रशासन व अध्यापकांनी डॉ. देवयांश निमोदिया यांचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0