चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद

05 Nov 2025 17:40:27
कारंजा लाड, 
accused-in-theft-case-arrested शहरातील बसस्थानक परिसरात २८ ऑटोबर रोजी दुपारी गर्दीचा फायदा घेत एका ७० वर्षीय वृद्धाच्या खिशातून ४२ हजार रुपयांची रोकड अज्ञात इसमाने लंपास केली होती. या घटनेचा तपास करताना कारंजा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद करत चोरी गेलेली रक्कम जप्त केली आहे.
 
 
accused-in-theft-case-arrested
 
फिर्यादी भगवान रायसिंग जाधव (वय ७०) रा. पिंप्री मोडक, ता. कारंजा यांनी १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ ऑटोबर रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान, कारंजा बसस्थानकावरून गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील ४२ हजार रुपये चोरले. या प्रकरणी कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०५ (२), भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत, पोलिस निरीक्षक दिणेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. सायबर पोलिस स्टेशन, वाशीम यांच्या सहकार्याने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी शेख यासिन उर्फ बिल्ला शेख रहुफ वय रा. अकोला यास अकोलामधून ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्ती पंचनाम्यानुसार हस्तगत करण्यात आला. accused-in-theft-case-arrested सदर कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सपोनि जयदीप पवार, पोहवा उमेशकुमार बिबेकर, पोहेकॉ गणेश जाधव, पोहेकॉ अजय धनकर, पोका अमित भगत, अनिस निन्सुरवाले, मोहम्मद परसुवाले, पोकॉ नितीन पाटील व सायबर पथकातील पोकॉ अविनाश इंगोले यांनी सक्रिय सहभाग घेतला.पुढील तपास पोहेकॉ उमेशकुमार बिबेकर करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0