मुंबई,
Aileen Wuornos will be coming to OTT जेव्हा ‘सीरियल किलर’ हा शब्द ऐकू येतो, तेव्हा आपल्याला सहज पुरुष गुन्हेगाराचीच कल्पना येते. मात्र, जगातील कुख्यात महिला सीरियल किलरपैकी एक अशी होती जिने तिचं जीवन दुःख, शोषण आणि वेदनादायी अनुभवातून सुरु केलं – ही आहे एलीन वुर्नोसची कथा. मीडियाने तिला ‘क्वीन ऑफ द सीरियल किलर्स’ म्हणून ओळख दिली आहे. तिच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आणि नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरीही आली आहे.
एलीन वुर्नोसचा जन्म १९५६ मध्ये मिशिगन, अमेरिका येथे झाला. तिचं बालपण संघर्षमय राहिलं; तिचा पिता मानसिक आजाराने ग्रस्त आणि गुन्हेगार होता, तर आईने तिला लहानपणीच सोडलं. १३ वर्षांची असताना तिला लैंगिक शोषण सहन करावं लागलं. स्वतः एलीननं म्हटलं की, ३० वेळा शोषण झाल्यानंतर तिला मानवतेवरून विश्वासच उडालाय. कमी वयातच एलीनने वेश्याव्यवसायात पाऊल ठेवले. १९८९ ते १९९० दरम्यान तिने फ्लोरिडा हायवेवर सात पुरुषांची हत्या केली. एलीनच्या म्हणण्यानुसार, हे सर्व पुरुष तिला शोषण करण्याची धमकी देत होते, आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिने त्यांना ठार मारलं. मात्र, पोलिस तपासातून तिला सीरियल मर्डरच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एलीन वुर्नोसला १९९१ मध्ये अटक करण्यात आली आणि २००२ मध्ये लेथल इंजेक्शनने मृत्यू झाला.
तिच्या जीवनावर आधारित २००३ मध्ये मॉन्स्टर चित्रपट तयार झाला, ज्यात चार्लीज थेरॉनने एलीनची भूमिका साकारली आणि ऑस्कर पुरस्कार जिंकला. याचप्रमाणे, नेटफ्लिक्सवर ‘एलीन: क्वीन ऑफ द सीरियल किलर्स’ नावाची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली आहे, जिथे प्रेक्षकांना एलीनच्या जीवनाची जवळून माहिती मिळण्याची संधी मिळते.