सर्वच पशूपक्ष्यांविषयी कारुण्य बाळगा : न्या. विवेक देशमुख

05 Nov 2025 20:30:50
वर्धा,
justice-vivek-deshmukh सर्व संत, विचारवंत आणि समाज सुधारकांनी पशूपक्षी आणि सजीव सृष्टीविषयी कारुण्यभाव जोपासला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कारुण्याची ही भावना प्रत्येकाने जोपासली तरच पर्यावरणाचा र्‍हास टाळता येईल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विवेक देशमुख यांनी केले.
 

justice-vivek-deshmukh 
 
बहार नेचर फाउंडेशनद्वारे स्थानिक आसमंत स्नेहालय येथे आयोजित पक्षीसप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, आसमंत स्नेहालयचे संचालक शिवाजी चौधरी, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, मानद वन्यजीव रक्षक तथा बहारचे उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांची उपस्थिती होती. पर्यावरणाला हानी पोहचविणार विकास आम्हाला नको आहे, अशी भावना डॉ. बाबाजी घेवडे यांनी व्यत केली. यावेळी उपस्थित अतिथींनीही समयोचित मार्गदर्शन केले. justice-vivek-deshmukh प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. संचालन डॉ. आरती प्रांजळे घुसे यांनी तर आभार बहारचे सचिव जयंत सबाने यांनी मानले. उद्घाटन समारोहाला बहारचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष दीपक गुढेकर, कोषाध्यक्ष राजदीप राठोड, सहसचिव देवर्षी बोबडे, अतुल शर्मा, अ‍ॅड. पवन दरणे, घनश्याम माहोरे, पर्यावरणप्रेमी गुणवंत डकरे, बाबाराव भोयर, आकाश जयस्वाल, सेवानिवृत्त वनपाल अशोक भानसे, नरेंद्र पहाडे, याकुब शेख, सुनील ढाले, प्रकाश कांबळे, राकेश काळे, आदींसह वन विभागाचे कर्मचारी, बहारचे सदस्य, सेवाश्रमातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
पक्षीनिरीक्षण, चित्रप्रदर्शन व वृक्षारोपणाने आरंभ
या सप्ताहाची सुरुवात पक्षीनिरीक्षणाने करण्यात आली. यात पक्षिमित्र, निसर्गप्रेमी व सेल अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी पक्षीवैभव चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच बुद्धटेकडी मित्र परिवाराच्या सहकार्याने टेकडीवर अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या संपूर्ण सप्ताहात बोर व्याघ्र प्रकल्प, रोठा तलाव, दिग्रस तलाव, सालोड येथील पक्षी अधिवास, पवनार येथील धाम नदी परिसर आदी विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करण्यात येणार आहे. पक्षीसप्ताहाचा समारोप १२ रोजी महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी उद्यानात करण्यात येईल. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात आढळणार्‍या पक्ष्यांची नोंद घ्यावी, असे आवाहन बहार नेचर फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0