नवजात बाळांना नदीत सोडण्याची प्रथा

05 Nov 2025 19:38:00
मारुती पाटणकर
चुरणी, 
newborn-babies-in-river जगाबरोबरच देशही विज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे, पण परंपरांना फारसा फरक पडत नाही. शहर असो वा गाव आजही अनेक कुटुंबांमध्ये प्रथा व परंपरा पाळल्या जात आहेत. राज्याच्या सीमेपासून चाळीस किलोमीटर अंतरावर बैतूल जिल्ह्यातील भैसदेहीमध्ये नदीच्या पाण्यात काळजाचा तुकडा टाकण्याची अनोखी परंपरा पाळली जात आहे. ही परंपरा किती जुनी आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी अनेक वर्षांपासून ती सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 

newborn-babies-in-river 
 
भैसदेहीच्या पूर्णा नदीवर कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस चालणार्‍या या जत्रेत शेकडो नवजात बाळांना नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी पाळणामध्ये सोडले जाते आणि काहीवेळाने बाहेर काढले जाते. यामागील तर्क असा आहे की, येथे नवस केल्याने अपत्यप्राप्ती होते. यासाठी ही परंपरा अनेक काळापासून सुरु आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. मेळ्यात मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून अपत्यहीन जोडपी नवसाची प्रार्थना करण्यासाठी येतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडायला येतात. नरेश आणि राणी हे महाराष्ट्रातील जोडपे सांगतात की, त्यांना पूर्णा मातेकडून मुलाची इच्छा होती. नवस केल्यानंतर त्यांच्या अंगणात समृद्धी आली आणि आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. बाळाला पाळण्यातून नदीच्या पाण्यात सोडताना भीती वाटत होती का? या प्रश्नावर ते म्हणाले की पूर्णा माईच्या कृपेने मला मुलाचा आशीर्वाद मिळाला. newborn-babies-in-river त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नाही. मुलाची इच्छा पूर्ण झाल्यावर लोक येथे येतात. मॉ पूर्णा नदी भैसदेही जवळ आहे. बैतुल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६५ किमीवर पूर्णा नदी असून तिला चंद्रपुत्री म्हणजेच चंद्राची कन्या म्हणतात. ती भैसदेही शहराजवळ उगम पावते. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अपत्यहीन जोडपी आणि लोक सुख-समृद्धीच्या आशेने जत्रेत येतात. चंद्रपुत्री नावाच्या पूर्णा नदीच्या उगमामागे अनेक पौराणिक कथा आहेत. काहींच्या मते हे सप्तऋषींच्या उपासनेचे फलित आहे तर काहींच्या मते या भागात दुष्काळ पडल्यानंतर एका राजाच्या तपश्चर्येमुळे भगवान शिवाने पूर्णाचा अवतार घेतला होता. एकेकाळी नदी दुधाच्या प्रवाहाप्रमाणे वाहत असेही सांगितले जाते.
 
 
Powered By Sangraha 9.0