आरमोरी,
centenary-anniversary-of-tarun-bharat आरमोरी तालुक्यातील मौजा पालोरा गाव आज कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने भक्तीमय झाले. दैनिक ‘तरुण भारत’ च्या शताब्दी वर्षानिमित्त गावकर्यांनी तुळस वृंदावन लागवड व तुळस विवाह अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी प्रभातफेरीत रामधुनच्या स्वरांत संपूर्ण गाव हरवले. महिला मंडळींनी आपल्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन मांडून गावातून मिरवणूक काढली. या भक्तिमय सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व बालगोपाल सहभागी झाले. गावकर्यांनी तरुण भारतच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत तुळस वृंदावनाची लागवड करून श्रद्धा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. centenary-anniversary-of-tarun-bharat तुळस विवाहाला ग्रामस्थांनी केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर आस्थेचा उत्सव मानत एकतेने साजरा केला. पालोरा ग्रामस्थांच्या या उपक्रमाने ‘तरुण भारत’ च्या शताब्दी वर्षाला खर्या अर्थाने संस्कार आणि श्रद्धेचा सुगंध दिला आहे.