सामूहिक तुळशी विवाह उत्साहात साजरा

05 Nov 2025 12:04:09
नागपूर ,
Dattatreya Nagar Nagpur मराठी दैनिक तरुण भारत व ज्येष्ठ नागरिक मंडळ, दत्तात्रय नगर–रघुजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने एनआयटी कॉम्प्लेक्स, सक्करदरा येथे सामूहिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात बासरी वादक मनोहर धाबेकर यांच्या सुरेल बासरी वादनाने झाली. त्यानंतर उत्तरा धाबेकर, शोभा कुथे, अर्चना देशपांडे, सीमा ब्रम्हे, प्रमोदिनी पारस्कर, अनिता आगाशे, निर्मला धाबेकर आणि मीना पिल्ले यांनी भक्तिगीते सादर केले.

non 
 
 
चारुशीला चारमोडे यांनी गणपती, दामोदर आणि तुळशीची यथाविधी पूजा केली, तर मनोहर धाबेकर आणि मुकुंद चारमोडे यांनी मंगलाष्टकांसह विवाह विधी पार पाडला. या प्रसंगी महिलांनी गरबा नृत्य सादर करून आपली कला सादर केली.मंडळाचे अध्यक्ष नामदेव फटिंग यांनी तुळशी ही २४ तास प्राणवायू देणारी पवित्र वनस्पती असून प्रत्येक घरात तिची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थितांचे व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.Dattatreya Nagar Nagpur  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर आणि ज्योती त्रिपाठी यांनी मोलाचे योगदान दिले.या सोहळ्यात एकूण सुमारे ३० महिला–पुरुष सहभागी झाले.
सौजन्य:श्रीराम दुरूगकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0