श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिरात रामकथा वाचन

05 Nov 2025 18:37:19
नागपूर,
Deendayal Nagar Nagpur दीनदयाळ नगर येथील श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिरात आज दिनांक ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत श्री संपुर्णानंदजी महाराज यांनी रामकथा वाचन सुरू केले आहे.

bhut 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात मंगल कलश स्थापना आणि आरतीने झाली. परिसरातील नागरिक, महिला-पुरुष भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिले.Deendayal Nagar Nagpur सात दिवस चालणाऱ्या या रामकथेत श्रीरामचरितमानसातील आदर्श, भक्ती आणि धर्ममार्गाचे सुंदर वर्णन करण्यात येईल.दररोज भक्तिगीत, आरती व प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य:राजीव भूत ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0