भंडारा,
elections-of-local-self-government आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होतो त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा अखेर झाली. संकेत मिळाल्यापासूनच आमची तयारी सूरूच होती. आता उमेदवारी पदरी पाडून घेण्यासाठी प्रत्येक इच्छुक वरिष्ठांच्या कृपेची सर्वांना वाट आहे. उमेदवार, राजकीय पक्ष एवढेच काय तर मतदारही तयार आहेत. मग प्रशासन सज्जन असेल असे कसे? प्रशासनही निवडणुकीच्या कामाला लागल्याने सर्वच जण " है तयार हम " च्या भूमिकेत आहेत.

निवडणुकीची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर संपली असली तरी आता खऱ्या अर्थाने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीचे तिकीट कोणाच्या पदरी पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. प्रत्येकाने आपला पदर पदर व्यापक करण्याच्या दृष्टीने त्या त्या पक्षातील वरिष्ठांना स्वतःचा विजयाचा दावा कसा बरोबर ठरू शकतो हे सांगण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे नेतेही सर्वकाही अभ्यासूनच उमेदवाराच्या घोषणेच्या मानसिकता आहेत. एक मात्र नक्की निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेचे असल्या तरी निर्णय हे नागपूर मुंबईच्या पातळीवरच होऊन उमेदवारी निश्चित होणार आहेत. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली अशा चार नगरपरिषदेसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. elections-of-local-self-government भंडारा नगर परिषद क्षेत्रात 85608, तुमसर 39756, पवनी 22270 व साकोली नगरपालिका क्षेत्रात 22,681 मतदार आहेत. हे मतदार जनगणनेनुसार आहेत. भंडारा नगरपालिकेसाठी 17 प्रभागातून 35, तुमसर साठी 12 प्रभागातून 25, पवनी नगरपालिकेत दहा प्रभागातून वीस आणि साकोली नगरपालिकेत 10 प्रभागातून वीस नगरसेवक निवडावयाचे आहेत. चारही नगरपरिषदेचे अध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने ती चुरस वेगळीच आहे. भंडारा पालिकेत सर्वसाधारण महिला, पवनी आणि साकोलीत ओबीसी महिला आणि तुमसर पालिकेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण पुरुष असे आरक्षित असल्याने महिलांचे भाग्य फळफळले आहे. जिल्ह्यात एकूण 211 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. कामाला लागले असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. राजकीय पक्ष व मतदारांनी सहकार्य करावे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. प्रशासन आपल्या परीने कामाला. तर दुसरीकडे दिवाळीनंतर पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी करण्याचे अनेक इच्छुकांनी धडपड सुरू केली आहे. राजकीय पक्षाच्या वरिष्ठांची मर्जी कुणाच्या पथ्यावर पडते यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.