वणी,
गडचिरोली जिल्ह्यात जिलानी बाबांच्या दर्शनाहून परतीच्या प्रवासात निघालेल्या Ex-soldier Rafiq Sheikh माजी सैनिक रफिक शेख यांच्या कारला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवार, नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास घडली.
Ex-soldier Rafiq Sheikhरफिक शेख (वय ५२) हे येथील गुरुनगरात राहत होते. ते दर महिन्याला जिलानी बाबांच्या दर्शनासाठी गडचिरोलीला जात होते. मंगळवारी सकाळी ते त्यांच्या कार क‘मांक एमएच२९ एआर५८५३ ने चालकासह दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरून परत येत असताना रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मागील कारची वाट पाहत ट्रकने मागून धडक दिली. या घटनेनंतर त्यांना व जखमी चालकाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात हलविले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले. बुधवारी दुपारी ४ वाजता वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे वणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.