- ग्राहकांची निव्वळ फसवणूक : शासनाचा महसूल बुडवला
अनिल कांबळे
नागपूर,
महागड्या विदेशी ब्रँडच्या सीलबंद बाटल्यांमधून दारु चाेरून दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरुन Fake alcohol विकणारी टाेळी जेरबंद केली. या टाेळीने आतापर्यंत ‘मापात पाप’ करीत लाखाे रुपयांची दारु चाेरून विक्री करीत ग्राहकांची फसवणूक केली. ब्रॅंडेडच्या नावाखाली विदेशी दारूच्या तस्करी रॅकेटचा पाेलिसांना भंडााेड केला असून सात आराेपींना अटक करण्यात आली आहे. पाेलिसांनी आराेपींकडून 135 लीटर दारू जप्त केली आहे. कळमना पाेलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महेंद्र रामभाऊ बांबल (43, गुलशननगर), निखील उफर् निक्कू राजू नाटकर (28, ओम साई नगर, कमळना), नारायण उफर् बंटी बंडूजी माेथरकर (35, कळमना, पावनगाव राेड), इब्राहिम बब्बु खान पठान (40, भांडेवाडी), राेशन राकेश शाहू (34, न्यू गणेशनगर, कळमना), गजेंद्र तिजूराम शाहू (36, भवानीनगर, पुनापूर मार्ग), मणीराम उफर् राहुल काेलेश्वर पासवान (25, गाैसिया काॅलनी, सक्करदरा) अशी आराेपींची नावे आहेत. ठाणेदार प्रवीण काळे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी चिखली चाैक येथील बंद असलेल्या पेट्राेलपंपाजवळ (एमएच 49 बीझेड 5328) या क्रमांकाची महिंद्रा बाेलेराे पिकअप गाडी थांबविली. महेंद्र बांबल हा चालक हाेता व वाहनात सहा बाॅक्सेसमध्ये सिग्रम्स राॅयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या बाटल्या दिसून आल्या. चालकाकडे काेणतेही टी.पी. बिल पावती नव्हती. संबंधित दारू बनावट असल्याची बाब चाैकशीतून स्पष्ट झाली. पाेलिसांनी बांबलला ताब्यात घेऊन त्याची सखाेल चाैकशी केली. निक्कूच्या मदतीने त्याने बंटी माेथरकर याच्याकडून माल आणला हाेता व ते त्याची बाहेर विक्री करायचे. आराेपी त्या पैशांतून माैजमजा करायचे.
हुबेहुब बनवायचे दारुच्या बाटल्या
Fake alcohol बंटीच्या घराची झडती घेतली असता तेथून पाेलिसांना सहा लीटर विदेशी दारू व राॅयल स्टॅगच्या 31 रिकाम्या बाटल्या आढळल्या. महेंद्र व निक्कू हे एज ओल्ड या गाेदामातून राॅयल स्टॅगचा माल डिलिव्हरीसाठी घेऊन जायचे. निक्कू हा गाडीवर लेबर म्हणून काम करत हाेता व ताे प्रवासादरम्यान खऱ्या बाटल्या तोडून त्यातील दारू पाण्याच्या बाटल्यांत भरायचा. खऱ्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्याल सीलपॅक करून त्या परत भरायचे. अर्धी दारु आणि अर्धे पाणी टाकून हुबेहुब बँ्डेड दारुच्या बाटल्या बनविण्यात येत हाेत्या.
बनावट बाटल्या आणि बनावट दारु
Fake alcohol आराेपी भंगार दुकानातून रिकाम्या बाटल्या विकत घ्यायचे. ते खऱ्या बाटल्यांतील दारू त्या बाटल्यांत जमा करायचे. त्या बाटल्यांतील दारू ते खऱ्या असल्याची भासवून विकायचे. इब्राहीम पठान, राेशन शाहू, गजेंद्र शाहू हे वाडीतील माैजा लाव्हा येथील मे.श्रीराम ट्रेडर्स या विदेशी दारू वितरण गाेदामातून विदेशी दारूचा माल डिलिव्हरीसाठी घेऊन जायचे आणि निक्कूप्रमाणे खऱ्या बाटल्यांचे सीलतोडून त्यात पाण्यासाेबत दारू भरायचे. पाेलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन बाेलेराे तसेच 135 लीटर विदेशी दारू व बनावट बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला. आराेपींकडून सील करण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांची झाकणेदेखील जप्त करण्यात आली.