फळ शेतीतून शोधला समृद्धीचा मार्ग

05 Nov 2025 20:04:52
वर्धा, 
fruit-farming केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, या उतीला साजेल असेच काम हिंगणघाट तालुक्यातील कडाजना येथील शेतकरी त्र्यंबक भाईमारे यांनी करून दाखविले आहे. त्यांनी फळ शेतीतून समृद्धीचा मार्ग शोधला असून ते इतर पारंपारिक पीकही घेतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत उद्यान पंडित कृषी पुरस्काराकरिता त्यांचा प्रस्ताव कृषी विभागाने पाठविला आहे.
 
 
fruit-farming
 
शेतकरी त्र्यंबक भाईमारे यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण हिंगणघाट येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते डागा मिलमध्ये काम करायचे. पण कामाचा मोबदला कमी मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांना सतावत होता. मात्र, त्यांना शेतीत काहीतरी करून दाखविण्याची इच्छा होती. त्यांनी शेती व्यवसाय निवडला. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्याचा निर्धार केला. पैशांची जुळवाजुळव केल्यानंतर कडाजना येथे १.३५ हेटर शेती विकत घेतली. fruit-farming याच शेतीत आता आपण मेहनत घ्यायची असा निर्धार केला. सुरूवातीला त्यांनी शेतीविषयी माहिती जाणून घेतली. वर्धा, नागपूर, चंद्रपूर तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील प्रगतीशील शेतकर्‍यांच्या शेतीला भेटी दिल्या. त्यांचे अनुभव जाणून घेतले. पारंपारिक पिकांना बगल देत फलोत्पादनाचे निश्चित केले. वाहत्या पाण्यासोबत शेतातील माती वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी शेत जमिनीची तीन भागात विभागणी केली. १०० टके सेंद्रिय पद्धतीनेच शेती करण्याचे ठरविले. १० टन प्रती एकर याप्रमाणे शेतात खत टाकले. त्यानंतर जाम येथील रोपवाटीकेतून मोसंबीच्या कलमा आणून लागवड केली. उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. याचवेळी त्यांना कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेची जाणीव झाली. अशाही स्थितीत त्यांनी स्वत:ला सावरत बांध बनवून त्यावर कागदी लिंबूची लागवड सघन पद्धतीने केली. त्यानंतर त्यांना कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. आज ते यशस्वी फळ उत्पादक शेतकरी म्हणून नावारुपा आले आहे.
त्र्यंबक भाईमारे शेतकरी उत्पादक कंपनीत सदस्य
सन २०१६ साली महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पांतर्गत ‘कापूस शेतकरी उत्पादक कंपनी लि. हिंगणघाट’ या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. हल्ली या कंपनीचे ३२० भागधारक शेतकरी आहेत. यात त्र्यंबक भाईमारे हे सदस्य आहेत. सन २०१९-२० पासून शेतकरी उत्पादक कंपनीचे भागधारक शेतकरी सेंद्रिय कापूस उत्पादन घेत असून एका अशासकीय संस्थेशी त्यांचा करारही झाला आहे. ही अशासकीय संस्था या कंपनीतील शेतकर्‍यांचा शेतमाल आधारभूत किंमतीपेक्षा अधिक भावाने खरेदी करते.
Powered By Sangraha 9.0