हदगाव-केदारगुडा बस सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

05 Nov 2025 19:05:01
हदगाव, 
Hadgaon-Kedarguda bus demand हदगाव ते तामसा, तामसा ते वारंगा (केदारनाथ मार्गे) आणि वारंगा ते नांदेड या मार्गावर एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. केदारनाथ, चोरंबा (बु), खरबी, कुसळवाडी, चोरंबा (खु), विठ्ठलवाडी, मनाठा, दाभडी आणि वारंगा या आदिवासी व ग्रामीण भागांतील नागरिकांना प्रवासासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकर्‍यांना बाजारपेठेत तर रुग्णांना उपचारासाठी जाण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
 
 
st
 
Hadgaon-Kedarguda bus demand  या पार्श्वभूमीवर हदगाव आगारप्रमुखांना ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये हदगाव-केदारनाथ,वारंगा-नांदेड या मार्गावर बससेवा तत्काळ सुरू करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी उपसभापती मनोहर माहुरे, उपसरपंच प्रतिनिधी मुंजाजी पाईकराव, शिवसेना संपर्क प्रमुख गजानन अनंतवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सीताराम राठोड, पुंजाजी भुरके, साहेबराव गायकवाड, घनश्याम अंकमवार तसेच अनेक गावकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0