बुलढाणा,
indian-talent-olympiad-excellence-award मुंबई येथे झालेल्या इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड नॅशनल लेव्हल एसलन्स अवॉर्ड कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून राष्ट्रीय सैनिकी शाळेचे शिक्षक प्रसाद पत्की यांचा सन्मान करण्यात आला. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी आणि देशातील सर्वोत्तम क्रीडापटू पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की हा क्षण माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा आहे. हा सन्मान माझी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची निष्ठा आणखी दृढ करतो. indian-talent-olympiad-excellence-award या मानाच्या गौरवाबद्दल इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडचे मनःपूर्वक आभार. राष्ट्र—ीय सैनिक विद्यालय, बुलढाणा चे अध्यक्ष विश्वनाथ माळी, सचिव विद्या माळी आणि प्राचार्य रवींद्र पडघान यांनी अभिनंदन केले आहे.