वायगाव हळदीला केनियातील निर्यातदारांची भेट

05 Nov 2025 18:19:17
समुद्रपूर, 
kenyan-exporters-visit-vaigao-haldi एझिम फार्मर इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (इएफआयसीसीआय), त्यांच्या निर्यात-प्रमोशन मोहिमेंतर्गत केनियातील आंतरराष्ट्रीय खरेदीदार पेरिस यांना जीआय-टॅग्ज असलेल्या वायगाव हळद समुद्रपूर तालुयातील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली.
 
 
kenyan-exporters-visit-vaigao-haldi
 
स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योगामध्ये क्रिशोन्नती शेतकरी उत्पादक कंपनी वायगाव हळद्या येथील संचालक, शेतकरी यांच्या सोबत नामांकित वायगाव हळद बाबत चर्चा करून निर्यात बाबत माहिती देण्यात आली. यावेळी किशोर घुमडे यांची वायगाव हळद लागवड पाहणी करण्यात आली. kenyan-exporters-visit-vaigao-haldi हळद प्रक्रिया उद्योगाकरिता गोडाऊनची पाहणी केले. एफपीओ संचालक पितांबर घुमडे, नितेश थूल, आशिष ठाकरे, जयश्री दिने यांनी कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योगामध्ये विदर्भ नैसर्गिक शेतमाल किसान प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, खैरगाव येथे वायगाव हळद पावडर आणि शोभा गायधने यांच्या कडील हळद लागवड पाहणी केली. संचालक सूरज मोहिते, विठ्ठल कारवठकर यांनी कंपनीच्या कामकाजाची माहिती दिली.
आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी वायगाव हळदीचे महत्त्व, भौगोलिक मानांकन हळदीचे आरोग्यासाठी व इतर आजारकरिता उपयुत असल्याची माहिती निर्यातदारांना माहिती दिली. स्मार्ट नोडल अधिकारी रोहन झंझारे, उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे, बारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. kenyan-exporters-visit-vaigao-haldi तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकारे, सचिन सुतार, उप कृषी अधिकारी सचिन वाळके, कृषी सेवक अनिकेत भुसंगे, राजेश चांदेवार, सुधीर हिवसे यांनी भेटीचे नियोजन केले होते. एझिम शेतकरी भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखडे यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0