लाडक्या बहीणीची ई-केवायसीसाठी धावपळ!

05 Nov 2025 17:53:34
मानोरा, 
ladkya-bahinichi-kyc-online राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी मानोरा तालुक्यात महिलांची प्रचंड धावपळ सुरू झाली आहे. ई-केवायसी केली नाही तर पैसे मिळणार अशा चर्चेमुळे अनेक महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे तर दुसरीकडे सेतू केंद्रांवर गर्दीचा उच्चांक गाठला आहे.
 
 
ladkya-bahinichi-kyc-online
 
दिवाळी संपताच महिलांनी सेतू केंद्रांकडे पुन्हा धाव घेतली आहे. अनेक केंद्रांवर सकाळपासूनच महिलांच्या रांगा लागल्या असून, काही ठिकाणी प्रतीक्षा वेळ ३ ते ४ तासांपर्यंत वाढला आहे. केंद्रांवरील संगणकीय अडचणींमुळेही काम मंदगतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावागावात विविध अफवा पसरल्याने काही महिलांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. काहींना पैसे आले, काहींना नाही अशा चर्चेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ladkya-bahinichi-kyc-online सेतू केंद्रांवर येणार्‍या महिलांना अनेकदा आधार लिंकिंग, ओटीपी त्रुटी, वय वा कुटुंबीयांच्या माहितीतील विसंगती अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ई-केवायसी प्रक्रिया फक्त शासनाच्या संकेतस्थळावरच करावी. तसेच अधिकृत केंद्रांबाहेर पैसे घेऊन ई-केवायसी करून देण्याचा दावा करणार्‍यांपासून सावध राहावे. माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी अनिवार्य असल्याने महिलांनी घाईगडबड न करता अधिकृत संकेतस्थळावरून किंवा सेतू केंद्रावरून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अंतिम मुदत काही दिवसांवर आली असल्याने प्रशासनाने सुविधांची वाढ करून महिलांची गैरसोयटाळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ई-केवायसी प्रक्रियेसाठी स्वतःचे आणि पतीचे अथवा वडिलांचे आधार क्रमांक आवश्यक आहेत. परंतु विधवा व घटस्फोटित महिलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मृत पावलेल्या पतीच्या आधारकार्डशी मोबाइल नंबर लिंक नसल्याने ई-केवायसी पूर्ण होत नाही. शासनाने या वर्गासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या नसल्याने या महिलांमध्ये अस्वस्थता आहे. शासनाने सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ladkya-bahinichi-kyc-online मात्र मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर महिला व बालकल्याण मंत्री यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू राहील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे दिवाळी संपताच महिलांनी सेतू केंद्रांकडे पुन्हा धाव घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0