रामटेक येथील लंबे हनुमान मंदिरात महाप्रसाद

05 Nov 2025 14:45:31
रामटेक,
Long Hanuman Temple Ramtek दिनांक ४ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेच्या निमित्ताने स्वर्गीय श्री मदनराव काशीकर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाप्रसाद वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम लंबे हनुमान मंदिर परिसरात पार पडला.या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला व महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध मदन काशीकर यांनी सांगितले.

mhendr 
 
या उपक्रमासाठी त्यांना सहकुटुंब तसेच मित्रपरिवाराचा मोठा पाठिंबा लाभला.Long Hanuman Temple Ramtek महाप्रसाद वितरणात माणिक काशीकर, स्नेहा काशीकर, राहुल काशीकर, अतुल काशीकर, संपदा कळवे, महेंद्र वैद्य आणि इतर मित्रपरिवार यांनी सक्रिय सहकार्य केले.
सौजन्य: महेंद्र वैद्य,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0