८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास जन्मठेप

05 Nov 2025 18:42:51
वाशीम, 
rape-of-8-year-old-girl शहरातील पंचशील नगर येथील एका ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधम आरोपीस विद्यमान अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने पोसो कायद्यान्वये आजन्म कारवास आणि २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, कलम ३६३ च्या गुन्ह्यात ५ वर्षे कारवास आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
 

rape-of-8-year-old-girl
 
याबाबत सविस्तर असे की, १ जून २०२४ रोजी वाशीम शहरातील पंचशील नगर येथील एका ८ वर्षीय चिमुरडी आई वडिलांसह शेजारी हळदीच्या कार्यक्रमास गेली असता विजय उर्फ भोलाराम बरखम रा. पंचशील नगर याने संधीचा फायदा घेत सदर बालिकेचे अपहरण करुन स्वतःच्या घरात तिच्यावर अत्याचार करुन गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची वाशीम शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी जावून तात्काळ बालीकेची वैद्यकीय तपासणी करुन पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध अप क्र. ३४/२०२४ कलम ३७६ (एबी), ३०७, ३६३ भादंवी सह कलम ४, ६ बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी तपास करुन आरोपीस अटक करुन विविध पुरावे गाळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. rape-of-8-year-old-girl याप्रकरणी येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विजय उर्फ भोलाराम बरखम यांची अंडर ट्रायल केस जलदगतीने चालवून सरकारी पक्षाने पीडिता, साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक अहवाल तपास अधिकारी यांचे पुरावे तपासून आरोपीवरील दोषारोप सिध्द झाल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी सरकार पक्षाचे वतीने अभियोक्ता माधुरी मिसर यांनी काम पाहीले. तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील, मदतनीस पोकॉ योगेश इंगोले, पोकॉ सतीष बांगर यांनी कोर्ट पेरवीचे काम पाहीले.
Powered By Sangraha 9.0