बुलढाणा,
elections-former-mayor-gokul-sharma आगामी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा शिवसेना मित्रपक्ष महायुती एकत्र लढावी अशी जनतेची इच्छा आहे. केवळ व्यक्तीगत राजकीय विरोध करून महायुतीला विरोध करणे योग्य नाही त्यातुन दोन्ही पक्षाचे नुकसान होईल यापूर्वी सुद्धा महायुती न झाल्याने नगराध्यक्ष पद वंचित सारख्या नवख्या उमेदवाराला मत विभाजनामुळे मिळाले हे राजकीय समीकरण विसरता येणार नाही. अशी प्रतिक्रीया भाजपाचे माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांनी दिली आहे.
यासंदर्भात पक्षप्रमुखांनी महायुतीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून महाविकास आघाडीकडे झुकलेल्या काही विशिष्ट मतदरांना रोखण्यासाठी दुसरा पर्याय नाही भाजपा शिवसेनेचा हिंदूत्ववादी मतदार तसेच निष्ठावंत कार्यकर्ते यांचा कल महायुतीकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. elections-former-mayor-gokul-sharma या त्यांच्या प्रतिक्रीयेला जेष्ठ नागरिक संघाचे मधूसूदन कुळकर्णी यांनी दुजोरा दिला आहे.