गुरुनानक जयंतीनिमित्त मानवतेचा संदेश

05 Nov 2025 20:28:40
वर्धा,
guru-nanak-jayanti प्रथम शीख गुरु गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार ५ रोजी संपूर्ण शहर भती आणि सेवेने भरून निघाले. शहरातील दयालनगर, पोद्दार बगीचा आणि मार्केट लाईन येथील गुरुद्वारांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह, या जयघोषात भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. तर दिवसभर शहरातील विविध ठिकाणी रतदान शिबिर घेण्यात आले.
 
 
guru-nanak-jayanti
 
पोद्दार येथील गुरुद्वारामध्ये ४८ तासांच्या अखंड गुरु ग्रंथ साहिब पठणाचा कार्यक्रम झाला. यामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग नोंदविला. अखंड पाठानंतर अरदास आणि भोग समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर गुरुचा लंगर प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांतर्गत सिंधी समाजाच्या वतीने रतदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर पोद्दार बगीचा, गुरुद्वारा संकुलात सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडले. शिबिरात ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी रतदान केले. प्रत्येक रतदात्याला आकर्षक भेटवस्तू आणि १ लाख रुपयांचा अपघात विमा प्रदान करण्यात आला. एचडीएफसी बँक, के. आर. अ‍ॅण्ड असोसिएट्स आणि गुरुद्वारा सेवा समितीने विशेष सहकार्य केले. गुरुनानक नगरमध्ये ‘हर घर रांगोळी - रतदानाचा संदेश’ यावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. ४८ घरांमध्ये काढलेल्या रांगोळ्यांनी रतदान आणि मानवतेचा संदेश दिला. guru-nanak-jayanti दरम्यान, समाजातील ज्येष्ठांनी, गुरुनानक यांच्या शिकवणी आजही तितयाच प्रासंगिक असून सेवा, करुणा आणि मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही, असे सांगितले.
मिरवणुकीत वाहेगुरुंचा जयघोष
गुरुनानक जयंतीनिमित्त सकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाहेगुरुंचा जयघोष करण्यात आला. महिला, पुरुष आणि मुलांसह शेकडो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. हातात निशाण साहिब घेऊन भाविकांनी भजन, कीर्तन आणि शबद गायले. मिरवणूक गुरुद्वारा दयालनगर येथून सुरू झाली आणि पोद्दार बगीचा गुरुद्वारा येथे समारोप झाला. मिरवणुकीत सहभागींसाठी फुलांची उधळन करून लंगर प्रसादाचे वाटप केले.
Powered By Sangraha 9.0