ट्रकच्या धडकेत दाेन दुचाकीस्वार ठार

05 Nov 2025 19:49:46
- पारडीतील थरार
 
अनिल कांबळे
नागपूर,
शहरात Pardi accident अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नुकताच पारडी पाेलीस ठाणे हद्दीतल्या आर्या यार्ड समाेरील बाराद्वारीकडे दुचाकीवरून निघालेल्या दाेघांना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दाेन्ही दुचाकीस्वाराचा उपरासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. हर्षवर्धन गाेपाल बाेहरा (45) आणि दिपेन ओमप्रकाश साेनाेने (24) असे ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत.
 
 
accident
 
Pardi accident पारडीतल्या साईनगर येथील रहिवासी दिपेन साेनाेने हा मित्र हर्षवर्धन बाेहरा साेबत दुचाकीने पारडीकडून बाराद्वारीकडे जात हाेता. महामार्गावरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दाेघेही दुचाकीवरून पडले. यात जखमी हर्षवर्धनला प्रथम मेयाे रुग्णालयात नेले जात हाेते. तिथे पाेचहेपर्यंत हर्षवर्धनचा मृत्यू झाला. या अपघातातील दुसरा जमखी दिपेन याचाही खासगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. काेमल साेनाेने यांच्या तक्रारीवरून पारडी पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0