ग्राहक पंचायतीची मागणी
नागपूर,
Petrol pump पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या वाहनात पेट्रोल, डिझेल भरतानाचा पाईप हा पारदर्शक पांढरा असावा, अशी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या वतीने करण्यात आली आहे. या संबंधी प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव डॉ. चारुदत्त चौधरी, संघटक अभय खेडकर, क्षेत्र संघटक नितीन काकडे, सहसचिव विलास ठोसर, आनंद संगई यांच्या स्वाक्षरीने संबंधित पेट्रोलियम मंत्रालय, सचिव, महासंचालक भारतीय मानक ब्युरो, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना यांना निवेदन आला. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्यांनाही पाठविण्यात आल्या.
यासंदर्भात अनेक ग्राहकांकडून विविध माध्यमातून वाहनात पेट्रोल भरताना कमी मिळते. तक्रार करूनही संबंधित Petrol pump पेट्रोलपंप वितरक लक्ष देत नाही, बरेचदा तक्रारीसाठी ग्राहकांकडे वेळ ही नसतो, जिल्ह्याचे संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या तर इंधन वितरणा दरम्यान इंधनाऐवजी कमी डिलिव्हरी किंवा इंधना ऐवजी हवा जाण्याच्या घटना काही ठिकाणी अनुभवायला मिळाल्या. अशा घटना सार्वत्रिक घडत नसल्या तरी अशा तुरळक घटनांमुळे ग्राहक आणि इंधन विक्रेत्यांमध्ये अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, असे ग्राहक पंचायतचे मत आहे.
यावर उपाय म्हणून पारदर्शकता पारदर्शन पाईपांचा पेट्रोलपंपावर उपयोग करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी व्यक्त केली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, ग्राहक व्यवहार विभाग आणि बीआयएस यांच्या समन्वयाने, किरकोळ इंधन स्टेशनसाठी पारदर्शक वितरण नळी अनिवार्य करण्याची व्यवहार्यता तपासावी. दृश्यमान वितरण आणि दैनंदिन सामंजस्य यंत्रणेसाठी योग्य मापनशास्त्र तयार करावी, ग्राहकांना संभाव्य कमी वितरणापासून संरक्षण करण्यासाठी आणि किरकोळ इंधन मापनात अचूकता सुनिश्चित करण्यासाठी तपासणी आणि पडताळणी मार्गदर्शक तत्त्वानुसार अद्यतनित केली जातील, असे निवेदनात नमूद केले आहे.
भारत सरकार Petrol pump पेट्रोलियम मंत्रालय, मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांनाही असेच निवेदन सादर करण्यात येऊन त्याची देशभरात अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरला जाईल, असेही ग्राहक विदर्भ प्रांत पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. प्रांत आयटीसेल प्रमुख चंद्रशेखर साठे, नरेंद्र कुळकर्णी, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय साळवे, जिल्हा सचिव प्रभाकर शिवणकर, महानगर अध्यक्ष शरद जिचकार, महिला प्रमुख तृप्ती आकांत, संध्या पुनियानी, उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, नगीनदास बैरागी, तुकाराम लुटे, वीरेंद्र चौबे या प्रमुख पदाधिकार्यांसह अनेकांच्या स्वाक्षरीसह हे निवेदन पाठवण्यात आले आहे.