प्लास्टिकमुक्त शहराचे स्वप्न ठरले फोल

05 Nov 2025 17:50:55
कारंजा लाड, 
plastic-free-city राज्य शासनाने आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली असतानाही कारंजा शहरात मात्र सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे.
 

plastic-free-city 
 
दिवाळीच्या दिवसांत या वापरामध्ये चांगलीच वाढ झाली असून, कचर्‍याच्या ढिगार्‍यात सर्वाधिक प्रतिबंधित पिशव्या दिसून येत असल्याने बंदीचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन निर्णयानुसार शहरातील दुकानात अथवा विक्रेत्याकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यानंतरही आढळल्यास हा दंड २५ हजार रुपयांपर्यंत वसूल केला जाऊ शकतो. मात्र, शहरात पथकाकडून कारवाई होताना दिसत नाही. कुठेही हातात कॅरिबॅग घेऊन फिरा कोणीही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लहान, मोठे व्यावसायिकही प्लास्टिक वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. सिंगल यूज प्लास्टिकचे विघटन वर्षानुवर्षे होत नसल्याने शहरातील कचर्‍यात त्याचा खच तयार झाला असल्याने कचर्‍यामध्ये प्लास्टिकच मोठ्या प्रमाणात दिसून येते. हेच प्लास्टिक हवेमुळे इतरत्र उडते. plastic-free-city काही ठिकाणी हा प्लास्टिक कचरा जाळला आत असल्याने विषारी धूर वातावरणात मिसळत आहे. त्यामुळे शहरातील वायुप्रदूषणाचा स्तर वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहेत. भरारी पथकामार्फत तपासणी मोहीम राबवून प्रतिबंधित प्लास्टिकचा जप्त करावा आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. प्लास्टिकमुक्त शहर मोहिमेला गती मिळाल्यास शहर खर्‍या अर्थाने स्वच्छ होईल. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तत्काळ सिंगल यूज प्लॉस्टिकवर पुन्हा कारवाई सुरू करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0