रोहित -विराट बद्दल मोठी अपडेट, या मालिकेत खेळणे कठीण

05 Nov 2025 17:25:44
मुंबई, 
rohit-virat भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत चमकदार खेळ दाखवत मैदानावर झळकले. अंतिम सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकले, तर कोहलीने नाबाद अर्धशतक नोंदवले आणि आपल्या संघाला विजयात महत्त्वाचा हातभार लावला. मात्र, आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक थोडा निराशाजनक अपडेट आला आहे.

rohit-virat 
 
सध्या भारत ए संघ आणि साऊथ अफ्रिका ए संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. मालिकेचे पहिले सामने १३ नोव्हेंबरला, दुसरे १६ आणि तिसरे १९ नोव्हेंबरला होणार आहेत. rohit-virat प्रारंभिक अंदाजानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत भाग घेऊ शकणार नाहीत. कारण बीसीसीआयच्या सेलेक्टर्सने या मालिकेसाठी वेगळ्या विचारधारेने संघ निवडण्याची तयारी केली आहे. तथापि, भारतीय संघ आणि साऊथ अफ्रिका राष्ट्रीय संघाच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत या दोन्ही खेळाडूंचा सहभाग निश्चित दिसत आहे. या मालिकेचा पहिला सामना ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, जिथे रोहित आणि कोहली पुन्हा मैदानावर आपला दमदार खेळ दाखवतील, अशी अपेक्षा आहे.
रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियामधील मालिकेत कप्तानीमधून मुक्त होऊन आपला दमदार खेळ सादर केला आणि प्लेयर ऑफ द सीरीजच्या मानकरी ठरले. rohit-virat तर विराट कोहलीने अंतिम सामन्यात ७४ धावांची शानदार पारी खेळत आपल्या फॉर्मची पुनर्प्राप्ती दर्शवली. त्यांच्या चाहत्यांना आता काही काळ थांबावे लागेल, मात्र लवकरच ते दोघेही मोठ्या मालिकांमध्ये मैदानावर पुन्हा झळकणार आहेत.
Powered By Sangraha 9.0