समीक्षा भिडकर सनदी लेखापाल

05 Nov 2025 22:15:33
पांढरकवडा, 
पाटणबोरी येथील Samiksha Bhidkar समीक्षा यादव भिडकर हिने नुकत्याच घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल परीक्षेत भरघोस यश संपादन केले. समीक्षा हिने इयत्ता दहावी परीक्षा गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, पांढरकवडा येथून ९४ टक्के प्रथम क‘मांकाने उत्तीर्ण केली. तसेच बारावी परीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूर येथून २०२० मध्ये ९६ टक्के गुणांसह प्रथम क‘मांकाने उत्तीर्ण केली.
 
 
samikhsa
 
Samiksha Bhidkar त्यानंतर बीकॉम पदवी तिने त्याच महाविद्यालयातून २०२३ मध्ये प्रथम श्रेणीत संपादन केली. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत तिने उल्लेखनीय यश समीक्षा हिने आपल्या या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील, परिवारातील ज्येष्ठ मंडळी आणि मित्रपरिवारांना दिले आहे. अभ्यासासोबतच तिला धार्मिक आणि सामाजिक कार्याची आवड असून ती विविध उपक‘मांमध्ये सकि‘य असते.
Powered By Sangraha 9.0