यवतमाळ,
अँग्लो हिंदी हायस्कूलची विद्यार्थिनी Samiksha Rathod समीक्षा जगदीश राठोड हिने मल्लखांबमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तिने अमरावती जिल्हा क‘ीडा कार्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तर स्पर्धेत यश मिळवत सांगली येथे होणार्या राज्यस्तर स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. समीक्षा राठोड हिने उत्कृष्ट मल्लखांब खेळाच्या कौशल्याच्या जोरावर जिल्हा स्तरावर हे यश संपादन केले.
Samiksha Rathod या चमकदार कामगिरीमुळे, आता ती संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणार आहे. राज्यस्तर मल्लखांब स्पर्धेसाठी तिची झालेली निवड अँग्लो हिंदी हायस्कूलसाठीही गौरवास्पद बाब ठरली आहे. ही प्रतिष्ठीत राज्यस्तर स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मिरज, जिल्हा येथील तालुका क‘ीडा संकुल येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, समीक्षासह सर्व पात्र खेळाडूंना ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी बाळाजी वरकडे, बापू सुमेलवाले आणि नरेश सावळे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.