कारंजा लाड,
protest-against-baghels-photo पुज्य सिंधी समाजाचे इष्ट देवतेबाबत आक्षेपार्ह विधान करणार्या अमित बघेल यांचेवर कारवाई करण्याची मागणी सिंधी पंचायत, कारंजा तर्फे उपविभागीय अधिकारी, कारंजा यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानंतर छत्तीसगड क्रांती सेना अध्यक्ष आणि जोहर छत्तीसगड पार्टीचे नेते अमित बघेल यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

या निवेदनात छत्तीसगड क्रांती सेना अध्यक्ष आणि जोहर छत्तीसगड पार्टीचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाच्या इष्ट देवतेबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमित बघेल यांनी त्यांच्या एका भाषणात, सिंधी समाजाला पाकिस्तानी असे संबोधून अपमानित केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल साई यांच्या विषयीही अवमानकारक वक्तव्य केले असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. सिंधी समाज अनेक वर्षांपासून देशाच्या विविध प्रांतांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेने राहात असून, समाजाविरुद्ध अशी असंवेदनशील आणि द्वेषपूर्ण विधान करणे हे समाजविघातक, विभाजनकारी आणि कायदेशीरदृष्ट्या गुन्हेगारक कृत्य आहे, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. protest-against-baghels-photo अशा विधानांनी समाजात फुट पाडण्याचा उद्देश आहे, म्हणूनच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर पूज्य सिंधी पंचायतचे उपाध्यक्ष दिपक बसंतवाणी, सचिव गुनामल जेसवानी, सहसचिव मोहन पंजवानी, कोषाध्यक्ष प्रकाश नागवाणी, तसेच समिती सदस्य नितेश फुलवाणी, मोतीलाल परवानी, प्रकाश फुलवाणी आणि सचानंद हरीराम थद्दानी यांच्यासह इतर समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहे.