वर पक्ष म्हणाले आम्ही हुंडा घेतला नाही...

05 Nov 2025 20:19:44
पुलगाव, 
vitthal-rumini-temple नजिकच्या नाचणगाव येथे आज विठ्ठल रुमिीणी मंदिरात चातुर्मास समाप्ती आणि सामूहिक तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक तुळशी विवाहात अनेक गंमती जमती झाल्या. वर पक्षाने आम्ही हुंडा घेतला नाही असे जाहीर केले तर कार्यक्रमाच्या समारोपात चक वधू पक्षाने आदर सत्कारात आम्ही कुठे कमी पडलो असेल तर सांभाळून घ्या... अशी साद घातली. यासह गावखेड्यातील विवाह समारंभात होत असलेल्या गप्पाही यावेळी रंगल्या.
 

vitthal-rumini-temple
 
तरुण भारतच्या शताब्धी वर्षानिमित्त आयोजित सामूहिक तुळशी विवाह कार्यक्रमात वर आणि वधू पक्षातील स्त्री आणि पुरुषांनी आनंद लुटला. तुळशी विवाह लागण्यापुर्वी श्रीकृष्णाची मूर्ती हनुमान मंदिरातून आकर्षक सजवलेल्या बोहल्यावर आणल्या केली. मुलीच्या मामाने विठ्ठलाच्या गाभार्‍यातून तरुण भारतने दिलेल्या वृंदावनातील तुळशीही आणली. त्यानंतर मुलीचे मामा आणि मुलाच्या मामांची परंपरेप्रमाणे गळाभेट ओळख झाली. यावेळी तुम्ही कुठले आणि आम्ही कुठले वगैरे प्रश्न विचारत ओळख कार्यक्रम
झाली. तांदूळ आणि ज्वारीच्या अक्षदा वाटल्यानंतर मंगलाष्टकं झाली. vitthal-rumini-temple वाजंत्री वाजली आणि लग्न सोहळा पार पडला. यावेळी वर पक्षाने आम्ही हुंडा घेतला नाही बरं असे ठणकून सांगितले तर तेवढ्यात आदराने आम्ही आदर सत्कारात कुठे कमी पडलो असेल तर सांभाळून घ्या अशी विनंतीही केली. मुलीचे मामा सुधाकर सुरेसे तर मुलाचे मामा म्हणून रवी उरकुडे यांनी भूमिका बजावली.
यशस्वीतेकरिता केशवराव दांडेकर, सुभाषराव पेशकर, दिनकर आडे, सुरेश पारिसे, गजानन सुरीसे, अतुल चांदोरे, प्रभाकर ढोक, आशिष येरवडे, रमेश गायकवाड, जगन अर्जुनकर, दत्ता सुरोसे, मनोज उरकुडे, वेदांत भीसे, योगिता खांडविलकर, प्रल्हाद ढवळी, बाबूजी पवार, विठ्ठल इंगळे, कृष्णा सोनोने, महादेव थोटे, विठ्ठल दुबे, सरोज चौबे, छाया राघोरते, योगिता पाटील, शिल्पा भोसले आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0