शहरात तुळशी विवाह सोहळा उत्साहात

05 Nov 2025 14:35:33
सिद्देश्वर नगर,
Tulsi Marriage Nagpur दिघोरी येथील सिद्देश्वर नगरात सतीश देशपांडे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंगलाष्टकांच्या गजरात व शंखनादाच्या निनादात तुळशी-विष्णूचा विवाह विधी संपन्न झाला. नातेवाईक, शेजारी व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.तुळशी विवाहानिमित्त घराचे सुंदर सजावट करण्यात आले होती. पारंपरिक पोशाखातील महिलांनी विवाह गीतांवर नाचत सोहळ्याला रंगत आणली. प्रसाद व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
 

satish
 
सौजन्य: सतीश देशपांडे ,संपर्क मित्र
दीनदयालनगर,
श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिर, दीनदयालनगर येथे सामूहिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. दैनिक तरुण भारत परिवार आणि समुत्कर्ष संस्था, दीनदयालनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याचे यजमानपद सौ. व श्री तुषार कवीश्वर तसेच सौ. कल्पना व श्री वाराणशीवार यांनी भूषविले. Tulsi Marriage Nagpurमंदिराचे पुजारी श्री मुकुंदराव डबली यांनी पौरोहित्य करून तुळशी-विष्णू विवाह विधी पार पाडला.कार्यक्रमाला तरुण भारतच्या गौरी सरनाईक, संस्थेचे सचिव दीपक पथे, पदाधिकारी मुरलीधर कुहेकर, प्रशांत खेडकर, राजीव भूत, रंजना दारव्हेकर, चोपडे यांसह संस्थेचे आजीव सभासद, वस्तीतील स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
dipak
 
सौजन्य:दीपक पथे,संपर्क मित्र
शिवनगर, नंदनवन
दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदनवन येथील शिवनगर परिसरात सामूहिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने हा सोहळा थाटात साजरा केला.सर्वप्रथम तुळस व भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करून सामूहिक विवाह विधी पार पाडण्यात आला. Tulsi Marriage Nagpurसर्वांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले.आजच्या धकाधकीच्या जीवनात सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, हा यामागचा हेतू ठेवून गेली अनेक वर्षे सुमारे १६ ते १७ परिवार हा सामूहिक तुळशी विवाह सोहळा साजरा करत आहेत.या वर्षीच्या सोहळ्यात ॲड. सेनाड परिवारासह पनपालिया, पुंजे, भड, मंडवाले, मोटघरे, वाकडे, कोल्हे, चव्हाण, रक्षीये, सेठिया, जामोदकर आदी परिवारांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
 
mdhura
 
सौजन्य:ॲड.मधुरा सेनाड,संपर्क मित्र
 
प्रभु नगर, न्यू सोमलवाडा
 
यावर्षी दैनिक तरुण भारत तर्फे सामुहिक तुळशी विवाह करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने प्रभु नगर, न्यू सोमलवाडा येथे आयोजक प्रज्ञा जोशी यांच्या घरी 10 कुटुंब एकत्र येऊन तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला. महिलावर्ग नऊवारीत तर पुरुषवर्ग मंगलवेशात आले होते.पौराहित्य सुशांत वाघ यांनी केलं. विवाह सोहळा नंतर सहभोजन करण्यात आले.
 
 
joshi
 
सौजन्य:प्रज्ञा जोशी,संपर्क मित्र
 
 
 
Powered By Sangraha 9.0