वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १८ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीट्सची मान्यता

05 Nov 2025 19:25:33
यवतमाळ, 
Vasantrao Naik Government Medical College वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजच वैद्यकीय परिषद कडून नव्याने १८ पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी सीट्सची मान्यता प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयात जुन्या ६७ पदवित्तर अभ्यासक‘माच्या सीट्स होत्या. आता नव्याने १८ सीट्सची मान्यता एनएमसीकडून प्राप्त झाल्याने एकूण ८५ सीट्स पीजी पदव्युत्तर अभ्यासक‘मासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
 
 
Medical College
 
Vasantrao Naik Government Medical College यामध्ये जनरल मेडिसिन विषयात ४, त्वचा व गुप्तरोग विभागात ३, पॅथॉलॉजी विभागात बधिरीकरण विभागात ४ व रेस्पिरेटरी मेडिसिन विभागात ३, अशा एकूण १८ पदवीत्तर पीजी अभ्यासक‘माच्या सीट्सची मान्यता मिळालेली आहे. या विभागांना पदवीत्तर अभ्यासक‘माच्या सीट्स मिळाल्यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये आणखी फार मोठी मदत मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना वैद्यकीय उच्च शिक्षणाची अधिक सोय होणार आहे. या सीट्सची मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ. अनिल बत्रा, सर्व विभागप्रमुख व पी.जी. उपअधिष्ठाता डॉ. आनंद आशिया यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करून यश संपादन केले आहे. त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
Powered By Sangraha 9.0