सिलिंडर घेऊन जाणार्‍या वाहनाची दुचाकीला धडक

05 Nov 2025 20:37:32
समुद्रपूर, 
vehicle-carrying-cylinders-hits-bike तालुक्यातील कोरा टी पॉईंट जवळ सिलिंडर घेऊन जाणार्‍या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आज बुधवार ५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गजानन घाणोडे (५५) रा. गिरोला असे मृतकाचे तर छाया घाणोडे (४०) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
 
 
vehicle-carrying-cylinders-hits-bike
 
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन घाणोडे व पत्नी छाया हे एम. एच. ३४ डि. जे. ०९८८ क्रमांकाच्या दुचाकीने नारायपूर येथील सरपंच मंजुषा माहुरे यांच्या घरी जात होते. दरम्यान, कोरा टी पॉईंटवर भरधाव वेगाने जात असलेल्या सिलिंडर वाहन एम. एच. ३२ यू. ३०६७ ने दुचाकीला जबर धडक देऊन चालक वाहन घेऊन पसार झाला. या अपघातात गजानन घाणोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जखमी छाया घाणोडे यांना तात्काळ कोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात हलविले. vehicle-carrying-cylinders-hits-bike घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिस ठाण्याचे कर्मचारी देवेंद्र उडाण, मनोज पानसर, तुषार इंगळे, दिलीप वांदिले यांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन व चालक संजय भेदुरकर रा. हिंगणघाट याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार रविंद्र रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0