नागपूर विभागात एड्सचा कहर; ३३ महिन्यांत ३९१ मृत्यू, दररोज दोन रुग्णांचा बळी

06 Nov 2025 11:33:41
नागपूर,  
aids-in-nagpur नागपूर विभागात एड्ससारख्या घातक आजाराने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती मोहिमा, तपासणी शिबिरे आणि उपचार योजना राबवूनही या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. गेल्या ३३ महिन्यांत (१ जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२५) एकूण ३९१ रुग्णांचा एड्समुळे मृत्यू झाला असून, म्हणजेच दररोज दोनहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. या कालावधीत ३२६७ नवे एड्स रुग्ण नोंदवले गेले आहेत. ही माहिती नागपूर विभागातील (६ जिल्हे) आकडेवारीवरून समोर आली आहे.

aids-in-nagpur 
 
ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितल्यानंतर आरोग्य सेवा उपसंचालक, नागपूर विभाग यांनी दिली. आकडेवारीनुसार हे सर्व रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या पुष्टी झालेले आहेत. या आजाराचे आणखी एक भीषण वास्तव म्हणजे — अनेक रुग्ण आपली ओळख उघड करत नाहीत. aids-in-nagpur अवैध लैंगिक संबंध आणि सामाजिक कलंकामुळे अनेक संक्रमित व्यक्ती उपचार न घेता गुप्तपणे इतरांना संक्रमित करत राहतात. यामुळे हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे आणि पुढे तिसऱ्याकडे झपाट्याने पसरतो.
दरम्यान, इतर संसर्गजन्य आजारांवरही चिंताजनक आकडे समोर आले आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान नागपूर विभागात:
मलेरिया : २०,८६७ रुग्ण, ५४ मृत्यू
डेंग्यू : ४,६६६ रुग्ण, १७ मृत्यू
चिकनगुनिया : १,५९९ रुग्ण
कॉलरा : ३१
गॅस्ट्रो : ९,१४६
डिसेंट्री : ४३,०६२
डायरिया : २५,०२७
व्हायरल फिव्हर : ३३०
टायफॉईड : १०,९५३ रुग्ण
मात्र, या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे संपूर्ण आकडे विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांनी अद्याप उपलब्ध केलेले नाहीत. सर्व मोहिमा आणि जनजागृती असूनही एड्सचे सावट नागपूर विभागावर अजूनही कायम आहे. aids-in-nagpur रुग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी अधिक कडक उपाययोजना हाती घेण्याची गरज स्पष्ट दिसते.
Powered By Sangraha 9.0