तभा वृत्तसेवा
पुसद,
ripai-athawale-party : मित्रपक्ष भाजपाकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील अशी भूमिका रिपाई आठवले पक्षाने संभाजीनगर येथील सांस्कृतिक भवन तथा बुद्धविहारात आढावा बैठक घेतली.
राज्यात होणाèया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणूक अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पुसद तालुका व शहर आढावा बैठक पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे याच्या अध्यक्षतेखालील व पुसद शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत प्रामुख्याने होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. नगरपरिषद निवडणूक रिपब्लिकन पक्ष ताकतीने लढविणार असून मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीसोबत युती असल्याने रिपब्लिकन पक्षाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत युती धर्म पाळत संपूर्ण राज्यात भाजपा व समर्थित उमेदवारास निवडणुकीत प्रचार व प्रसार करून आपली जबाबदारी पार पाडली. यामुळे महायुती असलेल्या पक्षाची सत्तादेखील आली आहे.
भाजपाच्या वरिष्ठ मंडळींकडून नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्यात येतील असे आश्वासनसुद्धा देण्यात आले होते. आगामी होऊ घातलेल्या पुढील महिन्यात नगरपरिषद निवडणुकीत एकूण 15 प्रभाग असून त्यामध्ये (चार-4) प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले आहे. आरक्षीत प्रवर्गातील किमान तीन जागा यामध्ये प्रभाग क्रमांक 11 क्रमांक 12 व 14 या रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे व वरिष्ठ मंडळीकडे करण्यात आली आहे.
भाजपाकडून सन्मानजनक जागा व वागणूक न मिळाल्यास ईतर समविचारी पक्षासोबत युती करून नगरपरिषद निवडणूक लढविली जाईल असा ठाम निर्धार व निर्णय पक्षाच्या सर्व पदाधिकाèयांकडून बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस रिपाइं पक्षाचे पुसद तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश धुळे, शहर सचिव अंबादास वानखडे, सचिव अमर पाटील, नितेश खंदारे, अनंता कांबळे, सुभाष पवार, संदीप वाढवे, विजय निखाते, भास्कर बनसोड, अवी खिल्लारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.