सुरत,
Asaram granted interim bail गुजरात उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला मोठा दिलासा दिला असून, त्याला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ८६ वर्षीय आसारामला हृदयविकाराचा त्रास असल्याने न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा आणि उपचारांचा विचार करून हा निर्णय दिला. आसारामच्या वकिलांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद मांडला की जोधपूर न्यायालयाने आधीच त्यांना सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे आणि त्यांना वैद्यकीय उपचार घेण्याचा अधिकार आहे. जर सहा महिन्यांच्या कालावधीत अपील सुनावणी पूर्ण झाली नाही, तर ते पुन्हा जामीनासाठी अर्ज करू शकतात.

न्यायालयाने सांगितले की जोधपूर उच्च न्यायालयाने आसारामच्या आरोग्याचा विचार करून जामीन मंजूर केला असल्यामुळे गुजरात उच्च न्यायालय वेगळ्या भूमिकेत जाऊ शकत नाही. राजस्थान सरकारने या जामिनाला आव्हान दिल्यास गुजरात सरकार देखील तशी कारवाई करू शकते. सरकारच्या बाजूने असा प्रस्ताव मांडण्यात आला की जोधपूर तुरुंगात पुरेश्या वैद्यकीय सुविधा नसल्यास त्याला साबरमती तुरुंगात हलवता येईल. मात्र पीडितेच्या वकिलांनी म्हटले की, या काळातही आसाराम अहमदाबाद, जोधपूर, इंदूर आणि इतर ठिकाणी प्रवास करत आहेत आणि त्यांना दीर्घकाळ उपचार मिळालेले नाहीत. जोधपूरमध्ये आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत आणि त्याबाबत त्यांचे तक्रारीचे काही पुरावे नाहीत. आसारामवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप होते. राजस्थानमधील जोधपूर न्यायालयाने २५ एप्रिल २०१८ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरविल्यानंतर ते तेव्हापासून तुरुंगात आहेत.