माजी आमदार बाळा काशीवारांची घर वापसी!

06 Nov 2025 18:20:38
भंडारा,
Bala Kashiwar joins BJP विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराची विरोधात बंडखोरी करणारे माजी आमदार बाळा काशिवार यांची घरवापसी झाली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला आहे. साकोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमदार राहिलेले भाजपाचे नेते बाळा काशीवार यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात बंडखोरी केली होती. भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे विरोधात अपक्ष निवडणूक लढविणारे सोमदत्त करंजेकर यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देत पक्षविरोधी काम केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
 
 

Bala Kashiwar joins BJP 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर राजकीय हालचाली वेगाने झाल्या. माजी आमदार बाळा काशीवर भाजपात येणार अशी चर्चा होती. त्यांच्या भाजपा प्रवेशामागे साकोली नगर परिषदेचे अध्यक्ष पद जोडले जात होते. अखेर त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बाळा काशीवार यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश भाजपासाठी या निवडणुकीत पक्षासाठी बूस्टर डोज ठरतो का? ठरतो का याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळेल.
Powered By Sangraha 9.0