नागपूर,
Baljgat Nagpur- तरुण भारत शताब्दी निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यातील तुलसी विवाह या उपक्रमा अंतर्गत बालजगत येथे ५ नोव्हेंबरला तुळशी विवाहाचा सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण आणि संस्कृतीची जाणीव बालकांपर्यंत पोहोचविणे हा होता.
कार्यक्रमाला बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे आणि मीरा ताई खडक्कार उपस्थित होते. विवाहानंतर मुलांना खाऊ व प्रसादाचे वितरण करण्यात आले. Baljgat Nagpur तुळशी विवाह या पारंपरिक समारंभातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र