कपड्याच्या शोरूमला भीषण आग; लाखोंचे नुकसान

06 Nov 2025 14:59:00
अकोला,
Fire breaks out at clothing showroom in Akola शहरातील जुन्या कापड बाजारात गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३- ३. ३०च्या सुमारास जे.जे. नावाने असलेल्या कपड्यांचे शोरूमला आग लागली. या घटनेत शोरूमचे लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोला शहरातील टिळक रोडवरील जुना कापड बाजार परिसरातील नागरिकांना जे.जे. शोरूम मधून धूर निघत असल्याचे दिसले. नागरिकांनी तातडीने शोरूमच्या मालकाला ही माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले.
 
 
fgghuo
 
काही मिनिटांतच दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. आगीचा भडका एवढा मोठा होता की जवळच्या इमारतींपर्यंत आग पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णतः नियंत्रणात आणली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शोरूममधील तयार कपडे, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या आगीत जळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0