वनविभागाने लाकूड तस्करीचा ट्रक पकडला

06 Nov 2025 19:06:40
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
timber-smuggling-truck-caught : गस्तीवर असलेल्या घाटंजी वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खैर जातीच्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी पहाटे येथील खापरी नाक्याजवळ करण्यात आली.
 
 
jk
 
माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे व पथकाने घाटंजी ते यवतमाळ रस्त्यावरील खापरी नाक्याजवळ सापळा रचला. या मार्गावर भरधाव येत असलेले वाहन क्र. एमएच29-9232 थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चालकाने वाहनाची गती वाढवून वाहन पुढे दामटले. या वाहनाचा पाठलाग करण्यात येत असतान काही अंतरावर संबंधीत वाहन चालक वाहन सोडून पसार झालेला आढळला.
 
 
या वाहनात खैर जातीचे 28 नग लाकूड आढळून आले. वाहनासह 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पांढरकवडाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, वनरक्षक प्रकाश मुंढे, अक्षय चाणेकर, पंकज भुसारी, दामोदर नेवारे, नरेश येन्नरवार, वाहन चालक नीलेश आगरकर यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0