Gen-Z च्या आंदोलनाने दणाणला पाकिस्तान!

06 Nov 2025 17:16:03
इस्लामाबाद,
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील मुझफ्फराबाद आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये पुन्हा निदर्शनांनी रस्त्यांवर पावलं रोखली आहेत. या वेळी Gen-Z ‘करो या मर’च्या मूडमध्ये दिसत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या युती सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. विद्यापीठ शुल्कात वाढ आणि परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेविरोधी सुरुवातीच्या शांततापूर्ण निदर्शने आता स्वातंत्र्य, आर्थिक मदत आणि पाकिस्तानी राज्याच्या कथित शोषणकारी धोरणांविरोधात व्यापक आंदोलनात रूपांतरित झाली आहेत.
 

दगा ७ ९  
३० ऑक्टोबर रोजी आझाद जम्मू आणि काश्मीर विद्यापीठात (यूएजेके) निदर्शनाची ठिणगी पेटली. सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी प्रशासन इमारतीकडे कूच केली आणि “फी नाही, स्वातंत्र्य!” असे नारे लावले. विद्यार्थ्यांचा आरोप होता की महागाईच्या काळात ४० टक्के फी वाढीमुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ताण येतो, तसेच प्रभावशाली कुटुंबांना लाभ देणारी ग्रेडिंग प्रणाली सुरू आहे. विद्यार्थ्यांनी म्हटले, आम्ही फक्त शिक्षणासाठी लढत नाही, तर आमच्या भविष्यासाठी लढत आहोत.
 
२० वर्षीय संगणक शास्त्राची विद्यार्थिनी आणि आंदोलन समन्वयक आयशा खान यांनी सांगितले की निदर्शनांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि कामगार, दुकानदार आणि महिला गटही विद्यार्थ्यांसोबत निषेधात सामील झाले आहेत. प्रमुख रस्ते रोखल्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख मुनीर खान चिंतेत पडले. आझाद काश्मीरचे झेंडे फडकवण्यात आले आणि शरीफ यांचे पुतळे जाळण्यात आले. सुरक्षा दलांनी अश्रुधुरा आणि लाठीमाराचा वापर करून नियंत्रण साधण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या प्राथमिक अहवालानुसार, किमान ४७ जण जखमी झाले. हा हिंसाचार पीओकेमधील दीर्घकालीन तक्रारींचे प्रतिबिंब आहे.
Powered By Sangraha 9.0