अनिल कांबळे
नागपूर,
Graduate police personnel : राज्य पाेलिस दलात तपास अधिकाऱ्यांची कमतरता असून शेकडाे प्रकरणे तपासी अधिकारी नसल्यामुळे प्रलंबित पडले आहेत. मात्र, त्यावर ताेडगा म्हणून पाेलिस दलात पदवीधर आणि सेवेत किमान सात वर्षे पूर्ण झालेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांना तपासाचे अधिकार देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाेलिस महासंचालक कार्यालयाकडून चार आठवड्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
सध्या राज्यात गुन्हेगारी वाढत असून गुन्हे दाखल हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर सक्षम तपासी अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासासाठी द्यावे लागतात. नियमानुसार, गंभीर गुन्ह्यांचा तपास पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते सहायक पाेलिस आयुक्तांपर्यंत देता येते. मात्र, पाेलिस शिपायी दर्जाच्या काेणत्याही कर्मचाèयांना काेणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार नसताे. बहुधा पाेलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पाेलिस निरीक्षक यांच्याकडेच तपास दिल्या जातात. परंतु, राज्यभरात पाेलिस अधिकाèयांची कमतरता आहे.
त्यामुळे एकाच पाेलिस अधिकाèयाकडे क्षमतेपेक्षा जास्त गुन्हे तपासासाठी असतात. परिणामतः प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेे आहे. त्यामुळे राज्य पाेलिस दलात पाेलिस शिपायी म्हणून रुजू हाेऊन सात वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केलेल्या आणि किमान पदवीधर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांना तपासाचे अधिकार देण्यात येणार आहे. राज्यात वाढती गुन्हेगारी आणि प्रलंबित तपासांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा अधिकार मिळवण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे, असे आदेश राज्य पाेलिस दलाच्या विशेष पाेलिस महानिरीक्षकांनी दिली आहे.
प्रशिक्षणानंतर हाेणार परीक्षा
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पाेलिस अंमलदारांना गुन्ह्याच्या तपासाचा अधिकार मिळण्यासाठी आता चार आठवड्यांचे प्रशिक्षण आणि परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. अनुत्तीर्ण अंमलदारांकडे तपास साेपविला जाणार नाही, असे अप्पर महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंमलदारांना प्रशिक्षणात पास हाेणे आवश्यक असणार आहे.मात्र, प्रशिक्षणाचा कालावधी आणि पद्धत याबाबत संभ्रम निर्माण झाला असला तरी पाेलिस कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
पहिल्या टप्प्यात 2675 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
राज्यभरातून तपासी अधिकाèयांच्या प्रशिक्षणासाठी पहिल्या टप्प्यात 2675 पाेलिस अंमलदार पात्र ठरले आहेत. त्यांना चार आठवड्यांचे प्रशिक्षण अकाेला, धुळे, तुरची, नानवीज आणि नाशिक येथील पाेलिस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येत आहे. सध्या पुरुष कर्मचाèयांना प्रशिक्षण देण्यात येत असून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष बॅचचे नियाेजन करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पाेलिस महासंचालक कार्यालयाने दिली आहे.