हदगाव,
hadgaon-jagadguru-ramanandacharya : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांच्या पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता हदगाव शहरातील नांदेड रोड, बीएसएनएल कार्यालयासमोर करण्यात आल्याची माहिती मराठवाडा उपपीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे, जिल्हा निरीक्षक बजरंग दायमा, जिल्हाध्यक्ष मुंडकर व हदगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग नरवाडे यांनी दिली.

या निमित्ताने समाजातील गरजूंना 29 मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दिवसभर येणाèया सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, युवासेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, प्रवचनकार, गुरुसेवक, प्रोटोकॉल अधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व उपासकांनी उपस्थित राहून पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीठ प्रमुख, पीठ व्यवस्थापक, जिल्हा निरीक्षक, जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व समित्यांच्या पदाधिकाèयांनी केले आहे.