अतिवृष्टीचा सर्वाधिक निधी आर्वीला

06 Nov 2025 20:03:00
आर्वी, 
sumit-wankhede : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळे ३३ टयांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळणार आहे. विेशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक निधी आर्वी, आष्टी, कारंजा या आर्वी विधानसभेतील शेतकर्‍यांना मिळणार आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी कटीबद्ध असल्याची माहिती आ. सुमित वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
sumit
 
जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आ. वानखेडे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते अनिल जोशी, प्रशांत वानखेडे, आर्वी तालुका ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, कारंजा तालुका अध्यक्ष चक्रधर डोंगरे, आष्टी तालुका अध्यक्ष सचिन होले, आर्वी शहर अध्यक्ष राहुल गोडबोले आदी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या अत्यंत संवेदनशील सरकारने तातडीने निर्णय घेतल्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राला १३७.०५ कोटीहून अधिक विशेष मदत प्राप्त झाली आहे. शेतकर्‍यांसाठी कधी नव्हे इतका मोठा आणि तत्काळ निधी उपलब्ध झाल्याची माहिती आ. वानखेडे यांनी दिली.  
 
 
राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरणार्‍या शेतकर्‍यांसाठी, सरकारने विशेष मदत पॅकेज अंतर्गत, येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेटरी १० हजार रुपये अतिरिक्त अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आर्वी तालुयातील १४७ गावातील २७ हजार १७८ शेतकर्‍यांसाठी ३३.२८ कोटी, आष्टी तालुयातील १५४ गावांतील १८ हजार ८४४ शेतकर्‍यांसाठी ११४.५९ कोटी तसेच कारंजा तालुयातील १२० गावातील २७.०२१ शेतकर्‍यांसाठी २६ हजार ३८ कोटी असा निधी वितरित करण्यात येत आहे. 
 
 
याशिवाय, ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईपोटी २.३० कोटी रुपयांसह ६२.८० कोटी रुपयांचा निधी कारंजा (२२.३३ कोटी), आर्वी (२४.८१ कोटी) आणि आष्टी (१३.३६ कोटी) तालुयांना यापूर्वीच वितरित करण्यात येत आहे. या निधी वितरणाच्या प्रक्रियेत, शासनाने १७ ऑटोबर रोजी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रातील १६ पैकी फत ८ महसूल मंडळातील शेतकर्‍यांचा समावेश केला होता. उर्वरित ८ महसूल मंडळांतील २७ हजार ६९५ शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तालुयातील वाढोणा, खरांगणा, रोहणा, दाउतपूर व आष्टी तालुयातील आष्टी, साहूर, तळेगाव येथील सर्व वंचित शेतकर्‍यांना न्याय मिळाला. आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व १६ महसूल मंडळांतील शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आ. वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी आर्वी विधानसभा प्रमुख उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0