अवैध कृषी साहित्य विक्री करणार्‍या केंद्रांवर छापा

06 Nov 2025 19:59:00
वर्धा,
illegal-agricultural-material-sales-center : जिल्ह्यात अवैधरित्या जैव संप्रेरकची विक्री करणार्‍या केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकूण दोन जणांवर कारवाई केली. यावेळी पथकाने २ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
raid
 
श्रीजित पानिकर (३५) रा. प्रथमेश प्रसुधाम दत्तनगर पुणे आणि स्वप्निल टोपरे (३५) रा. कल्याणनगर, पुणे हे दोघेही जिल्ह्यात अवैधरित्या विविध कंपनीचे जैस संप्रेरकची विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी केंद्रांवर छापा टाकला असता तिथे मोठ्या प्रमाणात जैव संप्रेरक कृषी साहित्य आढळून आले. कारवाईची चाहूल लागताच दोघेही पसार झाले.  पथकाने २ लाख ७४ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 
 
 
ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक अरविंद उपरीकर यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी शिवा जाधव, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक राजश्री चाफले, पोलिस कर्मचारी सचिन भारसंकर, रुपाली धानेवर आदींनी केली.
Powered By Sangraha 9.0