कोरेगाव पार्क जमीन प्रकरणावर फडणवीसांची चौकशीची ग्वाही!

06 Nov 2025 12:27:59
पुणे,
Koregaon Park land case कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील तब्बल ४० एकरांच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR) आणि लँड रेकॉर्ड्स विभागाकडून तपशील मागवण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीचे आदेशही दिले असून, तिच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
 

Koregaon Park land case 
फडणवीस म्हणाले की,“समोर आलेले मुद्दे प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. शासनाची भूमिका आणि पुढील कारवाई लवकरच स्पष्ट केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री अशा कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला पाठिंबा देतील, असे मला वाटत नाही. आमच्या सरकारचा ठाम विश्वास आहे की जर कुठेही अनियमितता आढळली, तर ती सहन केली जाणार नाही. सत्य समोर येण्यासाठी योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. सुमारे १८०० कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित असल्याची चर्चा असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0