दहशत माजवणार्‍या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा : आ. कुणावार

06 Nov 2025 16:51:12
समुद्रपूर. 
kunawar news गिरड खुर्सापार परिसरात वाघ, वाघीण तिचे तीन बच्छडे या ५ वाघांनी पाच ते सहा महिन्यापासुन शेतीशिरात मुत संचार सुरू केल्याने परिसरात दहशत आहे. यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी १३ सप्टेंबरपासून मिळाली आहे. मात्र वाघ अद्याप हाती लागला नाही. त्या घडामोडींवर आ. समीर कुणावार लक्ष ठेवून असुन त्यांनी आज ६ रोजी सकाळी १० वाजता वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा जनता जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करेल, अशी माहिती आ. कुणावार यांनी दिली. वाघाच्या मार्गावर वनविभागाचे ५० वर अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस असुन या जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
 
 
kunawar news
 
 
या वाघाला पकडण्यासाठी संपूर्ण जंगल पिंजून काढला. मात्र हा वाघ चतूर आहे. त्याला पकडण्यासाठी जंगलात बांधून ठेवलेली ७ जनावरे त्याने फस्त केले. पण, तो अद्याप हाती लागला नाही. हा वाघ कधी खुर्सापार जंगल परिसरात तर कधी नागपूर जिल्ह्यात फेरफटका लावत आहे. इकडे पकडण्याची भनक लागली की तिकडे जात आहे. १५ दिवसांनंतर पुन्हा या वाघाने आपला मोर्चा खुर्सापार जंगल परिसरात वळवला आहे. त्यामुळे चार दिवसापासून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पुन्हा वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आ. कुणावार हे वाघ पकडण्याच्या संपूर्ण प्रक्रीयेवर बारकाईने लक्ष ठेवण आहे. यासंबंधी त्यांनी आज सकाळी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून उपवनसंरक्षक हरबिदर सिंग यांना कॉन्फरन्सवर घेऊन वाघामुळे शेतकर्‍यांचे काय हाल आहे याची माहिती दिली. गिरड परीसरात दहशत निर्माण करणार्‍या वाघांना तात्काळ पकडून त्याचे स्थलांतर करा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिला. उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघाला पकडण्यासाठी जंगलात स्ट्राप कॅमेर्‍यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याच २ ड्रोन कॅमेरे सुद्धा रोज फिरत आहे. वाघामुळे होणार्‍या त्रासाची शेतकर्‍यांच्या तक्रार प्राप्त होत आहे. संपूर्ण परीस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहे. आज वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून उपवनसंरक्षक हरबिदर सिंग यांना कॉन्फरन्सवर घेऊन वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली असल्याची आ. कुणावार यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0