मोठी बातमी...मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड!

06 Nov 2025 14:47:23
जालना,
Manoj Jarange's murder conspiracy मराठा समाजाच्या नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की बीडच्या परळीतील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 

Manoj Jarange 
 
सदर प्रकरणात मनोज जरांगेंना ठार करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचेही पोलिसांनी उघड केले. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, या कटासाठी बीडमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. अमोल खुणे हे मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी असल्याचे सांगितले जाते.
 
 
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले गेले. यासंदर्भात गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील, त्यानंतरच मी माध्यमांसमोर बोलेन. आज कुठलेही भाष्य मी करणार नाही. राजकीय वर्तुळात या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सध्या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. जालना पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कटकार्यातील बड्या नेत्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेणे प्राथमिक उद्देश आहे, तसेच मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0