सामूहिक तुळशी विवाह सोहळा

06 Nov 2025 16:20:24
नागपूर,
Tulsi wedding इंदिरानगर परिसरात नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. परिसरात शहनाईचे स्वर गूंजत होते. मंगलमय सजावट आणि पारंपरिक पोशाखातील उपस्थित वराडी पाहुण्यांनी परिसराला सांस्कृतिक उत्सवाचे रूप दिले.
 
 Indiranagar

सामूहिक विवाह सोहळ्यामुळे समाजात एकोपा आणि ऐक्य वाढते आणि त्यामुळे सामाजिक व आर्थिक बळकटी निर्माण होऊ शकते, असे मत अशोक बोरेकर यांनी व्यक्त केले. तुळशीचे रोपटे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन कवडू भोयर यांनी उपस्थितांना केले. आरती प्रसाद वितरण करून उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. तुळशी विवाह सोहळ्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. Tulsi wedding हा सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नितीन तिजारे, समीर चौधरी, सौरभ भोयर, लिलाधर मसराम, निशा तिजारे, अरुणा बोरेकर, अक्षय भोयर, संजय लेंडे, मिलीन पटले, प्रमोद जेन्टे, अनिल लांडगे, मोरेश्वर लेंडे आणि त्यांचे मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र
 
 
नागपूर,
Tulsi wedding उज्वल नगर हनुमान मंदिराच्या पटांगणात मोठ्या धुमधडाक्यात तुळशी विवाहाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या विवाहाला वस्तीतील प्रतिष्ठित नागरिक उदय देशमुख आणि त्यांची पत्नी वंदना पूजेला बसले होते. प्रतिमा मनोहर यांनी विधी सांगण्याचे कार्य केले.
 
nagpur
 
तुळशी विवाह सोहळ्याला उज्वल नगर परिसरातील शंभराहून अधिक नागरिक उपस्थित होते. "तरुण भारत"तर्फे देखणे तुलसी वृंदावन आणि विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करण्यात आले, आणि त्याचा पूर्ण उपयोग करण्यात आला. नागरिकांनी "तरुण भारत"च्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वर्षी देखील तुळशी विवाहाचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. तुळशी विवाहानंतर महिलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. Tulsi wedding त्यानंतर प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदिती कोल्हारकर, मनीषा देशपांडे, आकांक्षा भट, कीर्ती घारे, पुनम घळसासी, मंजुषा सिंगरु, उदय मनोहर आणि विश्वास टांगसाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: सुधांशु दाणी, संपर्क मित्र
 
 
 
नागपूर,
Tulsi wedding तरुण भारतचे हे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने विविध ठिकाणी तुळशी विवाह उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये खापरी, शंकरपूर पुनर्वसन आणि शिव इलाईट टाऊनशिपमध्ये धडाक्यात सामूहिक तुळशी विवाह संपन्न झाला. हा समारंभ अत्यंत थाटात पार पडला. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील तुळशीला अत्यंत कलात्मकतेने सजवले होते. सुरुवात केली टाऊनशिपमधील शिव मंदिरापासून, जिथे प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील गोपाळ (तुळशी) घेऊन वाजत गाजत, मिरवणूक काढून विवाह स्थळी पोहोचवले.

nagpur
 
त्यानंतर तुळशीला औक्षवाण करून थाटामाटात स्वागत करण्यात आले आणि शास्त्रोक्त पूजा सुरू झाली. मंगलाष्टके आणि ढोल ताशांच्या गजरात, अंतरपाट धरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी आपल्या घरातील तुळशीचे गोपाळा सोबत एकत्र मिळून लग्न लावले. तुळशी विवाह संपल्यावर सर्वांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला. Tulsi wedding या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलवार आणि अनिता कलवार, तसेच श्रीयुत अग्रवाल आणि निमिषा अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले आणि सर्व व्यवस्था अतिशय योग्य रीतीने पाहिली.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0