‘खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’चा भव्य शुभारंभ

06 Nov 2025 19:39:00
नागपूर, 
MP Cultural Festival 2025 : नागपूरकरांची अभिमानाची परंपरा ठरलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – २०२५’ यंदा अधिक भव्य रूपात रंगणार आहे. या बहुप्रतिक्षित महोत्सवाचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायं. ६.३० वाजता हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि ‘चाणक्य’, ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ऐतिहासिक कलाकृतींचे दिग्दर्शक पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री व महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच आमदार व विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटनानंतर अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेले ‘हमारे राम’ हे नाटक सादर होईल.
 
 
khasdar mahotsav 2025
 
 
 
सकाळी ‘जागर भक्तीचा’ या शीर्षकाखाली दररोज धार्मिक पठण कार्यक्रम, तर संध्याकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान स्थानिक कलाकारांची सादरीकरणे होतील. महोत्सवात दिनांक ८ ते १८ नोव्हेंबर दरम्यान देशातील नामांकित कलाकारांचे सादरीकरण होणार असून विशाल मिश्रा, अखिल सचदेवा, रेखा व विशाल भारद्वाज, श्रेया घोषाल, शंकर महादेवन, आणि अजय-अतुल यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट्स महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी समृद्ध असलेला हा महोत्सव १२ दिवस चालणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार नागपूरकरांसाठी कला आणि संस्कृतीची पर्वणी सादर करणार आहेत. नागपूरकरांनी या सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, आणि सहकारी सदस्यांनी केले आहे.
 
 
- खासदार सांस्कृतिक महोत्‍सव २०२५ वेळापत्रक
 
 
*क्र.- तारीख - कलाकार असा तख्ता तयार करावा*
 
 
१ - शुक्रवार ७ नोव्हेंबर - उद्घाटन – प.पू. गोविंद गिरी महाराज व पद्म श्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची उपस्‍थ‍िती. अभिनेते आशुतोष राणा यांचे ‘हमारे राम’ नाटक
२ - शनिवार ८ नोव्हेंबर - विशाल मिश्रा – लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
३- रविवार ९ नोव्हेंबर - फ्यूजन
४- सोमवार १० नोव्हेंबर - वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील ‘राष्‍ट्रसंतांची जीवनगाथा’ हा दृक श्राव्‍य संगीतमय कार्यक्रम
५- मंगळवार ११ नोव्हेंबर - महाराष्‍ट्राची हास्य जत्रा
६- बुधवार १२ नोव्हेंबर - अखिल सचदेवा - लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
७- गुरुवार १३ नोव्हेंबर - संस्कारभारती ‘मिट्टी के रंग’ हा कार्यक्रम
८- शुक्रवार १४ नोव्हेंबर - रेखा भारद्वाज व विशाल भारद्वाज - लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
९- शनिवार १५ नोव्हेंबर - कविसंमेलन
१०- रविवार १६ नोव्हेंबर - श्रेया घोषाल - लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
११- सोमवार १७ नोव्हेंबर - शंकर महादेवन – संघगीत
१२- मंगळवार १८ नोव्हेंबर - अजय-अतुल - लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
 
 
- ‘जागर भक्‍तीचा’ कार्यक्रम वेळापत्रक
 
सकाळी ७ ते ८:३०
*क्र. - तारीख - कार्यक्रम असा तख्ता तयार करावा*
१ - शनिवार ८ नोव्हेंबर - श्रीमद् भगवत् गीता पठण
२ - रविवार ९ नोव्हेंबर - श्रीराम रक्षा व मारुती स्‍तोत्र पठण
३- सोमवार १० नोव्हेंबर - शिव महिमा स्‍तोत्र पठण
४- मंगळवार ११ नोव्हेंबर - श्री गणपती अथर्वशीर्ष स्‍तोत्र पठण
५- बुधवार १२ नोव्हेंबर - श्री हरिपाठ पठण
६- गुरुवार १३ नोव्हेंबर - श्री गजानन विजय ग्रंथ २१ वा अध्‍याय पठण
७- शुक्रवार १४ नोव्हेंबर - श्री विष्‍णू सहस्‍त्रनाम पठण
८- शनिवार १५ नोव्हेंबर - हनुमान चालिका व सुंदरकांड पठण
९- रविवार १६ नोव्हेंबर - परित्‍तदेशना (महा परित्राण पाठ)
१०- सोमवार १७ नोव्हेंबर - श्री सुक्‍त पठण
Powered By Sangraha 9.0